Friday, November 20, 2020

ऑनलाइन शिकवण्याची गुणवत्ता - 'सजग' शिक्षक सर्वेक्षण ऑक्टोबर 2020

 

शाळेत प्रत्यक्ष होणार्या वर्गापासून दूर राहून 6 महिन्यांहून अधिक काळ लोटल्यांवर शिक्षक परत वर्ग पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत का? शैक्षणिक समस्यांवर काम करणाऱ्या, कल्याणमधील सजग या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सुमारे 67% शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचा आपला कल व्यक्त केला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा शिक्षकांचा अनुभव जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 65 शिक्षकांनी स्वेच्छेने त्यांच्या प्रतिक्रिया गुगल फॉर्ममध्ये रेकॉर्ड केल्या. सर्वेक्षणात भाग घेतलेले 57% शिक्षक कल्याण पश्चिमेतील होते (जिथे सजगचे शैक्षणिक प्रकल्प आहेत), 29% शिक्षक मुंबई आणि मुंबई उपनगरातील आणि उर्वरित शिक्षक महाराष्ट्रातील इतर भागातील होते.

शिक्षकांनी शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शविली त्याचा तपशील आकृती 1 मध्ये आहे. शिक्षकांनी अशी तयारी दाखवण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात, जसं ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यात असणाऱ्या अडचणी किंवा कोविड -19 ची भीती कमी झाली. ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यात येणा-या अडचणी ह्या मुद्द्याचा ऑनलाइन सर्वेक्षणात सविस्तर तपास केला गेला.


आकृती  1

 ऑनलाइन वर्गातील सर्वात मोठी मर्यादा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभाग घेता येत नाही. 73% शिक्षकांनी असे उत्तर दिले कि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन वर्गांसाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा नाहीत. म्हणजे ते त्यांच्या 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. सर्व विद्यार्थ्यांकडे डिजिटल पायाभूत सुविधा असल्याचे नमूद करणाऱ्या शिक्षकांपैकी 67% शिक्षक हे खासगी शाळांमधील होते. परंतु सर्व खाजगी शाळेतील शिक्षक त्यांच्या 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मुंबई आणि मुंबईच्या परिघावरील कल्याण इथे, जर जवळपास ७५% शिक्षक हे आमचे सारे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात डिजिटल सुविधांच्या अभावाने येऊ शकत नाहीत असे म्हणत असतील तर महाराष्ट्राच्या सुदूर भागात अधिक वाईट अवस्था असेल अशीच शक्यता आहे. 

ऑनलाइन वर्ग दोन प्रकारे घेतले जातात. झूम किंवा गूगल मीट अ‍ॅपचा वापर करून लाइव्ह ऑनलाइन वर्ग किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर प्री-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाठवणे. सर्व्हेतील 81% शिक्षकांनी लाइव्ह ऑनलाईन वर्ग घेतले तर उर्वरित शिक्षकांनी पूर्व-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाठविले. ही दुसरी पद्धत मुख्यतः प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक वापरतात. ही दुसरी पद्धत साहजिकच कमी गुणवत्तेची आहे. विद्यार्थ्याला किती समजले आहे ह्याचा विद्यार्थी किंवा पालक ह्यांनी दिल्याशिवाय कुठलाही feedback शिक्षकाला ह्या पद्धतीत मिळत नाही. मुळातच ऑनलाईन वर्गातही विद्यार्थी सहभाग आणि feedback ह्यांवर मर्यादा येतात. प्री-रेकोर्ड व्हिडीओमध्ये सहभाग आणि feedback अजूनच घटतात. अर्थात वयाने लहान विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसवणे, हे पालकांच्या सातत्यपूर्ण सहभागाशिवाय कठीण आहे, कदाचित ते योग्यही नाही. जिथे पालकांना पाल्यासोबत सातत्याने वर्गात राहणे शक्य नाही तिथे कंटेंट पाठवायचा मार्ग निवडला गेला असावा. ऑनलाईन वर्गात येणाऱ्या अडचणींचा आढावा आकृती 2 मध्ये देण्यात आला आहे.

         

आकृती  2: ऑनलाईन वर्गात येणाऱ्या अडचणी

त्याचप्रमाणे शिक्षकांनाही ऑनलाइन वर्ग सुरू ठेवताना काही अडचणी येतात, ज्याचे तपशील आकृति 3 मध्ये दिले आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे आव्हान शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही होते. शिक्षकेतर आणि घरातील कामे यासारख्या इतर जबाबदा्या म्हणजे शिक्षकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यास अडथळे होते. शिकवताना साधनं न वापरता येणे ही दुसरी अडचण होती. विद्यार्थी व शिक्षक दोघानाही ही नवीन साधनं कशा प्रकारे वापरायचे ह्याची ओळख होणास पण खूप अडचणी निर्माण झाल्या. ऑनलाइन वर्गाची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे गृहपाठ तपासणे आणि विद्यार्थ्यांच्या आकलनावर  अभिप्राय (feedback) देणे. 68.7% शिक्षकांनी नमूद केले की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामाचे मूल्यांकन करणे कठीण होते. मूल्यांकन हा अध्यापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वत:हून अभ्यास न करणा-या विद्यार्थ्यांना प्रेरित करणे ऑनलाइन मोडमध्ये कठीण आहे.

 

       आकृती  3: ऑनलाईन क्लासेस दरम्यान शिक्षकांना येणाऱ्या अडचणी

सर्व्हेत सहभागी शिक्षकांपैकी जवळपास ७% शिक्षकांना वाटते आहे कि ते प्रत्यक्ष वर्ग आणि डिजिटल वर्ग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करू शकतात. हे चांगले लक्षण आहे. आता जेव्हा शाळा प्रत्यक्षात सुरू होतील तेव्हा कदाचित काही विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गांत येतील आणि काही नाही असेच होण्याची शक्यता आहे. समजा, अशाही अवस्थेत शाळा सुरू झाल्या तर शिक्षकांना दोन्ही प्रकारे शिकवावे लागू शकते. त्यांना असे करण्याचा आत्मविश्वास आहे ही चांगलीच गोष्ट आहे.

सर्व्हेतील ढोबळ प्रश्नांना आलेल्या प्रतिसादावरून हे स्पष्ट दिसते आहे कि ऑनलाईन शिक्षण हा आपत्कालीन पर्याय होता आणि शिक्षणाची प्रक्रिया जिवंत ठेवणे एवढ्याच माफक उद्दिष्टासाठी तो वापरला जाऊ शकतो. आरोग्याचा धोका घटल्यावर जितक्या वेगाने आपण हा आपत्कालीन पर्याय बंद करू तेवढे आपल्या फायद्याचे आहे. बरेच शिक्षक ह्या आपत्कालीन पर्यायाकडून मूळ पद्धतीकडे जायला तयार आहेत हे चांगलेच लक्षण आहे.

--

सर्वसामान्य शालेय शिक्षणव्यवस्थेचा उद्देश हा असतो कि विद्यार्थ्यांतील स्वयंप्रेरणा (nature) आणि घरातून मिळू शकणारे पाठबळ (nurture) ह्यांतून विद्यार्थ्यांच्या आकलनात आणि विविध क्षमता शिकण्यात जी स्वाभाविक तफावत येते त्याला शिक्षकांच्या सहभागाने मर्यादित करणे आणि विद्यार्थ्यांना किमान गुणवत्तेचे आर्थिक, सामाजिक, राजकीय जीवन जगायला आवश्यक क्षमता देणे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी येणारा सातत्यपूर्ण आणि जिवंत संपर्क आणि विद्यार्थ्यांची परस्पर मैत्री आणि चढाओढ ह्यामुळे शाळांतून विद्यार्थी घडतात. दुर्दैवाने कोव्हीड-१९ च्या काळात ऑनलाईन शिक्षणाने शाळांची भूमिका अत्यंत मर्यादित, केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमाने विद्यार्थ्यांपर्यंत नेणे, अशी करून ठेवली आहे. अशा ऑनलाईन शिक्षणात पालकांचा वारसा आणि स्वाभाविक क्षमता हेच घटक बलवान ठरणार आहेत. ह्या घटकांच्या अनुसार विद्यार्थी आकलनात मागे (learning loss) पडणार आहेत आणि विद्यार्थ्यांतील फरकही वाढणार आहे. कोव्हीड-१९ च्या काळात विद्यार्थी दशेत असणाऱ्या व्यक्तींच्या भविष्यातील कामगिरीत, त्यांच्या सुख-दुःखात ही विषमता कमी-जास्त प्रमाणात दिसून येणार आहे.    

त्यामुळे आकलनातील तफावत आणि वाढलेली शिक्षणाची दरी या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या शाळा पुन्हा सुरू केल्यावर आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील तेव्हा शाळा बंद (ऑनलाईन सुरू) असण्याच्या काळात निर्माण झालेली आकलन तफावत भरून काढण्याची मोहीम आपल्याला मोठ्या पातळीवर राबवावी लागेल. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा लहान इयत्तांसाठी ‘जोडणारे वर्ग (bridge courses) राबवूनच त्यातील विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे. प्राथमिक कौशल्ये आणि आकलन ह्यांत अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन माध्यमात झालेले नुकसान भरून काढणे हे शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीच्या कालावधीतच शक्य आहे. अन्यथा काही वर्षांनी जेव्हा कोव्हीड-१९ च्या काळांत शिक्षणाचे बाळकडू अर्धवट मिळालेल्या व्यक्ती समाजात सहभागी होतील तेव्हा त्यांच्या खुंटलेल्या वाढीबद्दल आपण काहीच करू शकणार नाही.

Sunday, September 27, 2020

वाचन आणि मी

 

जेव्हा मी एखादे  पुस्तक वाचायला घेते, तेव्हा त्यातली  मजा, कथा याबाबत  विचार चालू असतात. माझे सर्वात आवडते पुस्तक म्हणजे मृत्युंजय हे पुस्तक वाचून खूप दिवस झाले तरी आजही त्यातील पात्रांचे विशेषतः कर्णाचे केलेले वर्णन युद्धाचे वर्णन आजही डोळ्यासमोर उभे राहते.संपूर्ण महाभारत आत्ताच घडून गेल्या असे वाटते.

मुलां


ना वाचन शिकवताना
, मी मुलांच्या उच्चाराकडे जास्त लक्ष द्यायची मुलं वाचताना पूर्णविराम, अल्पविराम  स्वल्पविराम येथे थांबतात ना याकडे लक्ष असायचे पण या पुढे असे होणार नाही. 

आज मी प्रकट वाचन कार्यशाळा यातून मला मिळालेले अनुभव  आपणासमोर मांडत आहे.

सजगतर्फे आम्हां सर्वांसाठी सजिता मॅमनी तृप्ती अभ्यंकर आणि प्रमोद कांबळे



बळे यांचे प्रकट वाचन कार्यशाळेचे सेशन आयोजित केले.  ही कार्यशाळा म्हणजे आमच्यासाठी एक  वेगळाच अनुभव  आहे. ह्या कार्यशाळेतून प्रकटवाचनाचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले. 

प्रकट वाचनाची तृप्ती मॅमची पद्धत अगदीच वेगळी होती मला पहिल्यांदाच समजले की वाचन ही प्रक्रिया एकदा वाचून चालत नाही तर पुस्तकाचे वाचन तीन चार  वेळा केल्यास पात्र ,स्थळ , वेळ, भावना पात्रांचे बाह्यरुप ,पात्रांचे स्वभाव हे अधिक चांगल्या प्रकारे समजते.

पात्रांविषयीची चर्चा आमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरली. आम्ही व. पू .काळे यांचा बी . एम.पी 42 42 या कथेतील बी एम पी या पात्रा विषयी चर्चा केली तेव्हा प्रत्येकाची त्या पात्र बद्दलची मते खूप वेगवेगळी होती यावरून आम्हाला पात्रांच्या स्वभावातील वैविधता समजली त्यांच्यातील  गुणदोषांवर  सविस्तर चर्चा करता आली.

  माध्यमिक वर्गातील मुलांना शिकवताना वाचन  तीन चार वेळा करणे कसे गरजेचे आहे हे त्यांना यातून समजावता येईल व त्यांच्याकडून पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे वाचून घेता येईल.वाचन करताना पात्र ,स्थळ पात्रांचे बाह्यरूप, त्यांचे गुणदोष या सगळ्यांचा विचार करावा लागतो हे त्यांच्या मनावर बिंबवता  येईल यासाठी या कार्यशाळेचा मला चांगलाच उपयोग करून घेता येईल.

     प्रकट वाचनाच्या एका सेशनमध्ये मॅमनी  "त्या रात्री" या पुस्तकाचे प्रकट वाचन केले त्यावेळेस ते वाचन ऐकताना अंगावर काटा आला व मनात वेगवेगळे विचार येऊन गेले त्यावेळेस झालेल्या चर्चेत  फाळणीचा विषय निघाला फाळणीच्या वेळेचा प्रसंग असावा असे वाटले त्यावेळची सामाजिक परिस्थिती याचा ऊहापोह केला गेला.त्यावेळेस झालेल्या बायका मुलांची म्हातार्‍यांची झालेली परवड याविषयी चर्चा झाली .

   माध्यमिक वर्गातील मुलांसोबत सामाजिक विषयावर जरूर चर्चा करावी यातून मुलांची समाजाविषयीची मते आपल्याला समजू शकतात, आपणही समाजासाठी काहीतरी चांगले काम करू शकतो  हे त्यांच्या विचारांतून आपल्याला समजते.

 चित्रावरून गोष्ट लिहिताना मॅडमनी आम्हाला काही मुद्दे सांगितले जसे  सेटिंग ,वेळ ,स्थळ ,सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती मुड्स, या मुद्द्यांचा विचार करून गोष्ट लिहिल्यास ती अधिक परिणामकारक होते व ती गोष्ट वाचताना वाचकासमोर गोष्ट रुपी चित्रच उभं  राहतं.

     मला पडक्या घराचं चित्र  व त्यावर जमा झालेल्या कोळ्याच्या जाळ्यांच चित्र दिलं होतं मी मॅडमनी सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार करून एक आनंदी ओसाड घर ही गोष्ट लिहिली या गोष्टीत मी बॉम्ब हल्ल्यामुळे विस्कळीत झालेले, आनंदी घर कसे ओसाड झाले  याचे वर्णन केले.  गोष्ट  लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. चित्रावरून गोष्ट कशी लिहावी हे मला समजले.

चित्रावरून गोष्ट लिहिण्याची activity माध्यमिक मुलांना देता येईल त्यामुळे मुलं चित्राचे निरीक्षण करून त्यांच्या मनातील विचार योग्यरीतीने मांडू  शकतील.  मुलांची निरीक्षण क्षमता वाढेल.

मी गेली 18 वर्षे घरगुती प्राथमिक वर्गाच्या शिकवण्या घेत होते त्या वेळेस मुलांसोबत केलेले प्रकट वाचन म्हणजे एक अभ्यासक्रम पूर्ण करणे या उद्देशानेच व्हायचे पण या कार्यशाळेमुळे उशीरा का होईना प्रकट वाचनाचे मूळ उद्दिष्ट समजले आता कोणतेही पुस्तक हातात आले तरी ते तीन चार वेळा वाचून पुस्तकातील स्थळ काळ पात्र पात्रांचे बाह्यरुप  स्वभाव ह्या सगळ्यांचाच विचार सखोलपणे केला जाईल  हे  निश्चित. 


Ruchira Puranik 

SAJAG Volunteer

(Reading Workshop conducted by M/s Trupti Abhyankar, APU Alumni and Mr. Pramod Kamble, SAJAG Project Officer)

Tuesday, September 1, 2020

Learning during Lockdown

Lockdown मुळे distance mode of education चे आमचे प्रयोग चालू आहे. मोठे आव्हान आहे हे आमच्यासाठी. साधनांची कमतरता तर आहेच. त्यासोबतच आपण जे प्रयत्न करतोय त्याचे परिणाम काय आहे हे नीट कळत नसल्याने एक बेचैनी. फोन , whatsaapp, worksheet अशा वेगवेगळ्या मार्गाने मुलांपर्यंत पोहचण्याचे आमचे मार्ग चालू असतात. फोन वर नेहमी योगायोगाने सगळे भेटतीलचं असं नाही. आपण whatsapp वर पाठ्वालेले व्हिडीओ बघितले असतील का? worksheet मधले प्रश्न कळले असतील का ? गोष्टींची पुस्तके वाचतात का ? ह्या प्रश्नांनी सारखं मनात चिंता असते. कारण शिक्षकांसाठी सर्वात उत्कृष्ठ गिफ्ट म्हणजे मुलांच्या चेह-यावरची प्रतिक्रिया. 

आणि आता ती प्रतिक्रिया दिसत नसल्यामुळे एक मोठी दरी आपल्या कामात निर्माण झाली आहे. मग अचानक एक घटना घडते आणि मनातल्या सर्व प्रश्नांचे उत्तर सापडते. रत्नाचा आणि राकेशचा उत्साह (नाव बदलेलं आहे )  आणि रोहन (SAJAG Volunteer) याची ही पोस्ट - अशीच एक प्रेरणादायक घटना आहे . 

..................................................................................................................................................................

सकाळीच सजिताचा मेसेज आला


"तिला पोस्टाने वह्या पाठवल्या रे रोहन,परवाच मिळाल्या तिला वह्या....!"

मनात खूप भावना एकत्र आल्या .काही दिवसांनपूर्वी "सजग"च्या पेजवर एक पोस्ट शेयर केली होती. सजगची एक विद्यार्थिनी कोरोनोच्या अगोदर गावाला गेलेली आणि नेमकी तिकडचे अडकली पण तिने तिच्या नियमित अभ्यास क्रमात खंड पडू दिला नाही काही दिवसांनपूर्वी तिने पिंपळ पानांवर अभ्यास लिहिला आणि त्याचे फोटो सेंड केले त्यात 

रत्ना ने लिहिलं होतं ''पान कुठलही असो अभ्यास झाला ना मॅडम'' आणि म्हणाली "वही संपली आहे" 

परिस्थिती कशीही असो जिद्द माणसाला त्या परिस्तिथीवर मात करायला शिकवते हे लहानपणा पासून ऐकतंच होतो पण ह्या चिमुकलीने ते सिद्ध करून दाखवलं 

महागडे लॅपटॉप,सतत नेट कनेक्शन सर्व सुख सोई असताना सुद्धा नेहमीच परिस्थिती माझ्याच बाबतीत कशी निष्ठुर आहे ह्याच रडगाणं आपण करतं असतो ( मी ही त्यातलाच एक)

पण इच्छा असेल तर माणूस भला मोठा डोंगर सुद्धा फोडतो हेही तितकंच खरं 

रत्नाच्या जिद्दीला आणि सजगच्या कामाला मनापासून सलाम

साजिता,अनुजा,किरण ,भूषण ह्याचा सोबत राहून सजगमध्ये काम करायची संधी मिळते ह्या पेक्षा दुसरं समाधान कोणतंच नाही

आत्ता तिची वही कधीच संपणार नाही

"पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती करणारा बुद्ध आणि पिंपळपानांवर लिहून ज्ञानप्राप्ती करणारी रत्ना आज दोघेही एकचं वाटत आहे .तिची निरागसता अबाधित राहो...



Monday, August 10, 2020

Towards digital mode - SAJAG Youtube Channel


The month of April and May, our phones, social pages have been flooded with online content, invitation for online workshops. The pandemic witnessed the availability of free resources for children as well as adults. It included story telling, read alouds, songs and many interesting activities. But unfortunately most of these content are in English. Very few channels like Goshtrang, QUEST, Anandniketan, Pratham open source have educational videos in Marathi. With the lockdown extended till June here in Kalyan, teaching at the center was not an option. Hence we started making videos for our students. Though accessibility was a major issue, another issue was the issue of content that can be provided on a distance mode. 

  Initially our videos included topics for play, art, letter-writing. reading books etc. But as days extended the need for proper teaching videos were felt by parents, students and teachers too. The existing videos were focused mainly for early grades. But very few videos on remedial teaching were available. And the videos made by school focused on curriculum. We started with activities that can engage them at home and that involved parents too. But during the interaction with parents, we understood that all parents were not able to engage their students.  They expressed their frustration and inability. We then conducted a small survey of 10 parents to understand the kind of difficulties they are facing. 

From the survey, we understood that students are not following any routine and when parents and students come together, the parents are clueless as to how to engage them. For instance, if students sit for studies, parents don't know what to supervise, how to supervise. Along with interaction over phones, we thought that it would be better if videos showing such small concepts are made. And understanding the limitation available in Marathi, we thought it will be helpful if our videos are freely available in online platform. 

The videos were made for 2 target groups: 

1) The standards 3 to 5 as part of the remedial teaching programme. The content included Marathi, Maths, English and Art, 

https://www.youtube.com/watch?v=b9MhjMgvEiw&t=1s 

https://www.youtube.com/watch?v=Qp7QJRo5etM

https://www.youtube.com/watch?v=uTmpeEPxUYw

2) Videos for Parents that cover concepts like setting up routine for children, activities to engage with children, building responsibility and accountability for children. Many articles, books on parenting are available but very few in the medium of videos. We covered first topic of setting routine and activities that children can engage themselves within home. 

https://www.youtube.com/watch?v=0XY103waH3Y&t=4s

https://www.youtube.com/watch?v=lZ7yhUuXEKs

Do enjoy the videos and give your feedback. The pandemic has speed dialed the path of digitization of our content. A boon in disguise. 

Thursday, June 18, 2020

The Digital Divide

Vaishali, one of our learning centre students, messaged me yesterday, saying that she is worried about her studies. She said, “Madam, mala tension alay”. Vaishali is in 10th std., a regular student of SAJAG learning centre since last 2 and half years. A very sincere and loving student. She is the fourth child of a single mother. Her older brothers dropped out early and are working now. She has a very busy routine at home. She takes care of household work, helps mother in making paper hats and also takes time to study. Since the lockdown started, her only solace is the library books she occasionally lends from us. She is our first batch of 10th std student . Hence, we, the teachers of learning centre were also excited. In order to motivate them, we shared importance of formal education, higher studies and how 10th is an important phase of it last year. We had planned to start studies in May. But with the Covid 19 pandemic crisis, it did not work out. In the first month she was relaxed. But as the days extended and on hearing about her peers participating in the online class, she messaged me about her worry. Unfortunately, she is not the only student who feels left out.


In our learning centre, only 50% of the families of our students have access to good quality android phone suitable for online learning. Out of this 50%, only 27% phones are active, that is, able to regularly recharge their phone. This affects online learning. In addition, these students have no support from parents or peers as to guide them how to use an app as they too are digitally illiterate. Also, the figure 50% can be misguided. In that 50% one of the household members, in most cases, father, has a better-quality android phone. It generally doesn’t mean that it is accessible for the child. The impact on learning is going to be high on these students.

There is an interesting study to understand the performance based on socio-economic class done in Baltimore school mentioned in one of the chapters in the book ‘Outliers’ by Malcolm Gladwell. The assessments of students in school were done during the beginning and the end school year as also after the students returned from the summer holiday. The study depicted that through the school year, there were not much difference in the scores of students across socio-economic status. But, in the tests conducted after summer break, there was a huge difference seen in the scores. In the tests done after the holidays, the students from higher socio-economic group outscores the students from low socio-economic background. In Malcolm’s words – “Poor kids may out-learn rich kids during school year. But during the summer they fall behind”. Our experience has been not that different. Hence, we at SAJAG learning centres, do not give long holidays. We have observed that any holidays’ cannot be more than two weeks. More than that leads to huge gap. In the centre during any break, we engage them in various fun-filled as well as learning activities. But with this Covid 19 pandemic, they have already experienced a gap of more than two months. With its extension, the loss of students’ learning is going to be very high.

Access to learning either in physical form or in online form through opening of schools, libraries should be considered, especially, for the families of lower socio-economic background. With no support at home and the schools and the NGOs being helpless to reach them, the ultimate brunt of the loss is suffered by the students. Currently, we are relying mainly on our weekly phone calls and our occasional videos which reach few of our students. Libraries with lending and borrowing services should be opened. There should be measures to provide tabs to all students who have yellow or orange ration card/ no ration card. With partnership with local NGOS, local centres should be opened and trusted with. Community support in this direction should also be encouraged. Multiple small batches at the centres can be started following the physical distance guidelines.  
Students like Vaishali have the hope and courage to dream. She works hard to make it possible. She is smart to convince us and gather supporters like us to help her. Will the Covid 19 crisis dampen her spirits and pushed to join her brothers?

Sajitha
Co-founder SAJAG

Sunday, March 8, 2020

नवीन सुरुवात


सहा महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर पुन्हा सजगचं काम सुरू झाले. काम सुरू करताना खूप एक्सईटमेंट तर होतीच पण विहंगची (तेव्हा ६ महिनाचा होता) ओढही होती. मी गेल्यावर तो घरी राहील नाआजी आजोबांना त्रास नको व्हायलाखूप दमवेल काअसे आणि अनेक प्रश्न मनात घर करून डोक्यात घोंगावत होते. 
पण जसे काही  दिवस गेले विहंगचे प्रश्न डोक्यातून झटकन उडून गेले. त्याची आजी आजोबांसोबत चांगलीच गट्टी जमली होती.
आता डोक्यात प्रश्न होते ते माझे. खूप दिवसांनी काम सुरू झाल्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा कमी झाला होता. याच कारणं की घराबाहेर इतका वेळ राहणेत्यात मुलांचा आवाज- गोंधळदुपारची झोपायची सवयखूप कामे डोळ्यासमोर आणि डोक्यात आहेत पण करायची इच्छा असून ते करता येत नव्हतंजाणवणारा थकवा यामुळे पाहिले आठवडे खूपच वाईट गेले.
रोज घरी आले की आज काय चुकलं याची खंत वाटायची. त्यात एका नवीन क्लासची जबाबदारी माझ्यावर होती. त्या मुलांशीजागेशीतिथल्या लोकांशी काहीच परिचय नसल्याने क्लास मॅनेज करणंही कठीण वाटू लागलं. बाकी दोन्ही क्लासला काही प्रॉब्लेम येत नाही मग याच एका क्लास मधेच मी का वैतागून जाते हे कळत नव्हतं. याच कारण असं होतं की नुकतीच ओळख झाल्याने ऍडजस्ट व्हायला जरा वेळ गेला.पण आता जरा सुरळीत सुरू झालाय अस वाटतंय. गेलेला कॉन्फिडन्स पुन्हा कमवायाला मुलांची खूप मदत झाली.

आमच्या अभ्यासवर्गाची सुरवात मुक्त खेळाने होते. त्यात एक मुलाने बिल्डिंग बनवून म्हणाला,"मॅडम तुमच्यासाठी वरती घर बनवलाय. तुमच्या बाबू ला घेऊन या इथं राहायला". हे ऐकल्यावर मज्जाच वाटली. एक मुलाने किती सहज माझ्यासाठी घर बांधले. मग हवामानमोजणी झाल्यावर गाणी घेतो. गाणे झाल्यावर मुले म्हणाली मॅडम पुन्हा घ्या ना गाणं. किती मस्तय हे गाणं. मी शिकवलेलं गाणं मुलांना आवडतंय आणि पुन्हा म्हणायची इच्छा दिसल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळाली. का गोष्टीची व्हिडीओ दाखवल्यानंतर विद्याने तिच्या मांजरीसाठी घर बांधलं आणि मला हात धरून,"चला ना मॅडम घरी". असं म्हणत घेऊन गेली. तसेच एकदा मी भूषण ला एक वर्कशीट सोडवायला दिलं. तर तो पटकन म्हणाला," मॅडम माझं हे वर्कशीट झालंय. मी सांगतो तुम्हाला कुठलं चाललंय माझं. तुम्ही नसताना मी खूप पुढे गेलोय". नवीन क्लास मध्ये तर धमाल असते. एक दिवस अभ्यास सुरू असताना मी एका मुलाला वाचनासाठी मदत करायला गेले. त्याच्या बेंच वर बसून त्याला समजावत होते तर सागरने हळूच मला विचारलं,"काय यो मॅडम तुम्हाला आठवण न्हाई का येत विहंग ची?" त्यावर काय उत्तर द्यावे कळलं नाही कारण आठवण येण्यासाठी मी त्याला विसारलेलेच नसतेशिवाय माझी ही धडपड, भीती मी माझ्या ऑफिस मध्ये न संकोच करता सांगू शकल्याने मला अजून बरं वाटलं. कुठल्या गोष्टीत मला अजून सुधारणा करायची आहे आणि कुठली माझी फक्त मनाताली भीती आहे हे कळायला मदत झाली.

मी काही careeristic woman नव्हते पण सजग मध्ये ह्या मुलांना शिकवायला लागल्या पासून मनात एक उद्देश्य तयार झालं आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.

Anuja Limaye
Project Manager
SAJAG

Saturday, March 7, 2020

जागतिक महिला दिन २०२०

दिवाळी उपक्रमानित्मिताने सजीता आणि 'सजग'च्या मुलांची भेट झाली .कार्यक्रम आटोपल्यावर तिने सहज विचारलं कि या मुलांच्या आईना पण शिकायची इच्छा आहे तु जॉईन होशील का ?
सुरुवातीला ५० तरी बायका उत्सुक आहेत असं कळल पण अनुभवाप्रमाणे १०-१२ जणीच आल्या.पहिला सेशन होतांना काहीच अंदाज नव्हता कि पुढे काय होणार आहे? आम्हाला कोणत्या पद्धतीने शिकवायचे आहे किंवा त्यांना नक्की काय शिकायचे आहे? ढोबळमानाने अक्षर ओळख पासून सुरुवात करू अस मला वाटला होत.
पण चक्क तसं न होता फार मजेदार पद्धतीने सजिताने सुरुवात केली त्याने त्या सगळ्या ताई आणि मी सुद्धा जोडले गेलो.
 introduction सेशन उत्तम पार पडल्यावर त्यांना येणाऱ्या अडचणी   विचारल्या त्यांना शिक्षणाची निकड का भासते आहे त्याबद्दल विचारलं.   बँक चे फॉर्म भरता येत नाहीत, लोकांकडून भरावे लागतात.तसेच इतर   योजनाचे फॉर्म्स, शाळेचे फॉर्म ,नोटीस न वाचता येणे ,मुलांना अभ्यासाला   बसवलं तर एवढ तरी वाचून दाखव मग बसतो अस मुलांनी सांगणे.   किराणा सामान यादी लिहिता येत नाही म्हणून घरच्या लोकांनी हसणे.   सर्वात महत्वाची अडचण होती ती म्हणजे whatsappचे मेसेज वाचता न   येणे 😃
ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी त्यांना शिक्षणाच्या सकारात्मक कडे घेऊन आल्या आणि त्यांच्या सोबत मी सुद्धा  माझ्या वेळेचा सदुपयोग करण्याचा श्री गणेशा केला.
सगळ्या ताईना थोडीफार अक्षर ओळख होती अस नव्हतं काहीना जोडाक्षरे वाचता येत होती तर काहीं कधीही शाळेत न गेलेल्या ताईही इथे होत्या.
अक्षर ओळख बाराखडी पासून सुरु न करता रोजच्या स्वयंपाकातील, किराणा यादीसामानापासून सुरुवात केली. त्यासाठी chart बनवताना मलाही मजा आली. आमचा वर्ग नीट सुरु झाला. ह्या सगळ्या ताईसोबत मलाही खूप शिकायला मिळाले.
picture book session, एखादी साधी गोष्ट उदा. 'बाजारात जाणे' यावर त्यातील आधारित शब्द ,वाक्ये घेणे .त्यावर आधारित छोटेखानी नाट्य रुपांतर सादर करणे .ह्या सगळ्या वेगवेगळ्या activity त आम्ही सगळ्या ताई सोबत रमलो.
    माझ्यासाठी हा पूर्णपणे वेगळा अनुभव ठरला. त्यांच्यासाठी तास design करणे , वेगवेगळ्या activity च्या कल्पनांचा विचार करणे.गोष्ट निवडणे . chart presentation , conversational basedछोटेखानी नाटक plan करणे अश्या खूप साऱ्या activity ने दिवस व्यापला गेला .एखाद सेशन नीट घेता आले नाही तर त्यावर वाईट वाटणे सुरु झाले.त्यावर मात करत ते कस छान घेता येईल हा विचार सुरु झाला .माझ्या विचाराच्या,बुद्धीच्या कल्पना विस्तारल्या पण माझ्या अंगभूत मर्यादाही जाणवल्या ,जसे 'का' व' मा ' मधील फरक ओळखता  न येणाऱ्या ताईना मला शिकवता येईना.माझ्या गटात इंग्रजी सुरु झाले तेंव्हा माझ्याच इंग्रजीची बोंब आहे हे माझ्या लक्षात यायला लागले.कुठेही Indian standard time प्रमाणे जाणारी मी आता क्लासला वेळेत पोहचण्यासाठी धडपडू लागले. 😀
   शिकवणे ...त्यातही सोप्या पद्धतीने समोरच्याला कंटाळा न आणता शिकवणे हि फार कठीण गोष्ट आहे ,रंजक पद्धतीने शिक्षण boring होणार नाही अश्या पद्धतीने शिकवणे सजीताला उत्तम जमत तिच्याकडून मी खूप शिकतेय.
       आधी 'नाटक' अस नुसत नाव काढल तरी  घाबरणाऱ्या ताई आता मात्र उत्साहाने त्यात भाग घेऊन बसवताना दिसतात. video शूट ला हि घाबरत नाहीत. कुठल्याही activityला तयार असणारा असा आमचा 'प्रौढ शिक्षण वर्ग' आहे .बचती चे महत्व , आर. डी. योजना , बँक account माहिती , पेन्शन योजना असो कि लायब्ररी activity musical chair च्या रुपात खेळणे असो तर कधी नुसता dance त्यातही झिंगाट असो कि गरबा ,कधी आपुलकीच्या गप्पा असो तर कधी चक्क शाब्दिक चकमक 😂 असा आमचा वर्ग आम्हाला  भरपूर एनर्जी देतो. सगळ्या ताईना सुद्धा वर्ग चुकला तर वाईट वाटते. 
विहारात जेव्हा वर्ग सुरु केला तेंव्हा वाटलं होता की इतक्या जवळ वर्ग असेल तर खूप ताई येतील आजूबाजूच्या वस्ती तील ...पण अस झालं नाही.बऱ्याचजणीना शिकण्याची ओढ आहे कारण आमच्या वर्गात नवनवीन enrollment होत राहते पण ती कायम टिकत नाही.कारण त्या वर्गात येण्यासाठी त्यांना बरेच अडसर पार करून यावे लागते .बहुतेक जणी कामाला जातात तिथून दुपारी ३ पर्यंत  परत येतात , काहीतरी पटकन खाऊन किंवा नुसता चहा घेऊन ४ च्या वर्गाला हजर राहतात. काहींची तर संध्याकाळची कामे सुद्धा आहेत.५ च्या ठोक्याला परत जावेच लागते.कामाची ठिकाण लांब आहेत घरी गाडी असली तरी घरचे कोणी शिकवत नाहीत कि देत नाहीत,इतक्या लांब चालत जातात आणि येतात. ह्या साठी मागच्या आठवड्यात activa चालवण्याचे प्रशिक्षण दिले त्यात १० जणी नी भाग घेतला त्यात ६ जणी ना आता गाडी चालवता येतेय.😊
 काहीना छोटी मुले आहेत त्यांना सांभाळण्यासाठी कोणतीही सपोर्ट सिस्टीम नाही.त्यामुळे त्या रेग्युलर येऊ शकत नाही.काही जणी आता या वयात शिकून काय करायचं अश्या विचाराच्या तर ह्या वर्गात येणाऱ्या ताईना हसणारे हि बरेच आहेत. आज २०२० उजाडले तरी स्त्रियांची परिस्थिती फार बदललेली नाही ,वूमन्स डे निमित्ताने तर हे फार जाणवत.
स्वत:च्या न्यूनगंडावर मात करत ...लोक काय म्हणतील इ. इतक्या अनेक अडथळ्यावर मात करत  रेग्युलर ताईची पटसंख्या १०-१२ जणींची आहे. ७ नोव्हेंबरपासून ते आज मार्च उजाडला तरी आमचा वर्ग छान सुरु आहे.जेमतेम एक माणूस जाईल अशा गल्लीतून वाट काढत डोक्यावरची छप्परे चुकवत सगळ्या ताईच्या घरी जातो. एक खोली आणि छोटा व्हरांडा अस छोटेसे घर जरी असले तरी त्यांचे मन मात्र फार मोठे आहे. वर्ग झाल्यावर चहा बिस्कीट चा आग्रह ठरलेलाच. सजिताला अवार्ड मिळाले तर तिचे कौतुक फुलांचा गुच्छ आणि पेढे देऊन करणाऱ्या आणि मलाही वाढ दिवसाला फुल, हाताचे घड्याळ देऊन कौतुक करणाऱ्या आमच्या सगळ्या ताई गुणी आहेत.
  ह्या सगळ्या उपक्रमात माझा खारीचा वाटा आहे पण तरीही आज  ८ मार्च २०२० रोजी मी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करतेय असं वाटतय. असा हा सार्थकी लागलेला महिला दिन तुमच्याही वाट्याला येवो हि शुभेच्छा !

Trupti
Volunteer
SAJAG



HAPPY WOMAN'S DAY TO ALL💐 😃

Women's Day Special




SAJAG* is three and half years old now. And in these three years, to hire a team of two teachers, I have asked about 50 women if they were interested to work, waited for 27 women to respond, interviewed about 20 women, hired 9 women. There was not a moment when I was not looking for a teacher in SAJAG. And quality of teaching or qualifications were the least of the criteria for appointment but only few things like reaching the interview on time, communicating in case of problems were few criteria that would lead to consideration for appointment.
The reasons for high staff turn-over was not ‘disliking the work or the work conditions’ but the inability to manage multiple responsibilities at home especially with children/elderly and work. Thought teaching is considered ‘the easy job’, as the best option for balancing work as well as home responsibilities, it was a challenge for me to set a team.
Having worked in NGOs before, I have understood how working space can be demanding, motivating, enthralling, (and also frustrating) for women. How they find ways to fight for their space at work and at home. I remember when I was working in Wada five years back, the women used to come in saris and change to salwar kameez for some of our work activities as modern dresses was not allowed in their customs. But after five years of work they confidently come to work in salwar kameez. Their fight to find this space and trust was not an easy one. Contrary to what some may believe, its challenging in urban areas too.  If you lack social support, support like babysitting, elderly support becomes costly which ultimately puts the burden on women. As an employer, I am still finding my balance where to set in some of the non-negotiables and where to be flexible. But my team till now has been very supportive in ensuring the quality of work as priority.
Since it was a continuous heartwrenching experience of hiring women and creating expectation and seeing them go, I was curious to learn more about it. According to the ILO report of India, 42% urban women were attending to domestic duties in 1993-94, while in 2011-12 this increased to 46.1% . And amongst these women, only 28% showed willingness to be employed but the preferences were jobs near household premises and on a part-time basis. The main factors mentioned for the sudden drop in women’s participation is increasing access to education (choice of work is delayed because of it), reducing employment opportunities, increase in household incomes reducing participation of women in income generation, low employment security, wage parity and balancing the competing burdens of work and family responsibilities. Of the percentage of working women, most of them are employed in informal sector where their risk of exploitation is highest.
Most of the women from the community I work with are employed in informal sector like maids, vegetable vendors etc. They work because of the household demands. And whatever they earn is spent which leaves very less room for saving. But the economic empowerment which they get helps them to spend in things they believe is important like their children’s school and tuition fees etc.
Considering the experiences of hiring, have understood to make the timings flexible for women. Most prefer to match their work timings when their children are at school. This means that they do not get break from responsibilities but it helps a lot in positive social life as well as economic empowerment. At the end of three years of SAJAG, I am not writing to complain but am proud of SAJAG team members who have continuously strived to find the balance between home and work – a work which they believe in.

Sajitha 
Co-Founder 
SAJAG
(SAJAG is an NGO working with students of urban poor) 

Sharing experience of two of the teachers in successive posts. (in Marathi)