Sunday, March 8, 2020

नवीन सुरुवात


सहा महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर पुन्हा सजगचं काम सुरू झाले. काम सुरू करताना खूप एक्सईटमेंट तर होतीच पण विहंगची (तेव्हा ६ महिनाचा होता) ओढही होती. मी गेल्यावर तो घरी राहील नाआजी आजोबांना त्रास नको व्हायलाखूप दमवेल काअसे आणि अनेक प्रश्न मनात घर करून डोक्यात घोंगावत होते. 
पण जसे काही  दिवस गेले विहंगचे प्रश्न डोक्यातून झटकन उडून गेले. त्याची आजी आजोबांसोबत चांगलीच गट्टी जमली होती.
आता डोक्यात प्रश्न होते ते माझे. खूप दिवसांनी काम सुरू झाल्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा कमी झाला होता. याच कारणं की घराबाहेर इतका वेळ राहणेत्यात मुलांचा आवाज- गोंधळदुपारची झोपायची सवयखूप कामे डोळ्यासमोर आणि डोक्यात आहेत पण करायची इच्छा असून ते करता येत नव्हतंजाणवणारा थकवा यामुळे पाहिले आठवडे खूपच वाईट गेले.
रोज घरी आले की आज काय चुकलं याची खंत वाटायची. त्यात एका नवीन क्लासची जबाबदारी माझ्यावर होती. त्या मुलांशीजागेशीतिथल्या लोकांशी काहीच परिचय नसल्याने क्लास मॅनेज करणंही कठीण वाटू लागलं. बाकी दोन्ही क्लासला काही प्रॉब्लेम येत नाही मग याच एका क्लास मधेच मी का वैतागून जाते हे कळत नव्हतं. याच कारण असं होतं की नुकतीच ओळख झाल्याने ऍडजस्ट व्हायला जरा वेळ गेला.पण आता जरा सुरळीत सुरू झालाय अस वाटतंय. गेलेला कॉन्फिडन्स पुन्हा कमवायाला मुलांची खूप मदत झाली.

आमच्या अभ्यासवर्गाची सुरवात मुक्त खेळाने होते. त्यात एक मुलाने बिल्डिंग बनवून म्हणाला,"मॅडम तुमच्यासाठी वरती घर बनवलाय. तुमच्या बाबू ला घेऊन या इथं राहायला". हे ऐकल्यावर मज्जाच वाटली. एक मुलाने किती सहज माझ्यासाठी घर बांधले. मग हवामानमोजणी झाल्यावर गाणी घेतो. गाणे झाल्यावर मुले म्हणाली मॅडम पुन्हा घ्या ना गाणं. किती मस्तय हे गाणं. मी शिकवलेलं गाणं मुलांना आवडतंय आणि पुन्हा म्हणायची इच्छा दिसल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळाली. का गोष्टीची व्हिडीओ दाखवल्यानंतर विद्याने तिच्या मांजरीसाठी घर बांधलं आणि मला हात धरून,"चला ना मॅडम घरी". असं म्हणत घेऊन गेली. तसेच एकदा मी भूषण ला एक वर्कशीट सोडवायला दिलं. तर तो पटकन म्हणाला," मॅडम माझं हे वर्कशीट झालंय. मी सांगतो तुम्हाला कुठलं चाललंय माझं. तुम्ही नसताना मी खूप पुढे गेलोय". नवीन क्लास मध्ये तर धमाल असते. एक दिवस अभ्यास सुरू असताना मी एका मुलाला वाचनासाठी मदत करायला गेले. त्याच्या बेंच वर बसून त्याला समजावत होते तर सागरने हळूच मला विचारलं,"काय यो मॅडम तुम्हाला आठवण न्हाई का येत विहंग ची?" त्यावर काय उत्तर द्यावे कळलं नाही कारण आठवण येण्यासाठी मी त्याला विसारलेलेच नसतेशिवाय माझी ही धडपड, भीती मी माझ्या ऑफिस मध्ये न संकोच करता सांगू शकल्याने मला अजून बरं वाटलं. कुठल्या गोष्टीत मला अजून सुधारणा करायची आहे आणि कुठली माझी फक्त मनाताली भीती आहे हे कळायला मदत झाली.

मी काही careeristic woman नव्हते पण सजग मध्ये ह्या मुलांना शिकवायला लागल्या पासून मनात एक उद्देश्य तयार झालं आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.

Anuja Limaye
Project Manager
SAJAG

1 comment:

  1. Keep it anuja..खुपच सुंदर लिहीलं आहेस.. तुझ्या पुढील कामासाठी खुपखुप शुभेच्छा....अजिबात आत्मविश्वास कमी होऊन देऊ नकोस..आणि याच अनुभवाचा तुला विहंगच्या संगोपनासाठी खुप फायदा होईल.. आणि आजी आजोबा त्याची काळजी घेत आहेत तर तु बिनधास्तपणे तुझ्या कामावर लक्ष देऊ शकशील..परत एकदा तुझ्या कामासाठी खुप खुप शुभेच्छा...

    ReplyDelete