Tuesday, September 1, 2020

Learning during Lockdown

Lockdown मुळे distance mode of education चे आमचे प्रयोग चालू आहे. मोठे आव्हान आहे हे आमच्यासाठी. साधनांची कमतरता तर आहेच. त्यासोबतच आपण जे प्रयत्न करतोय त्याचे परिणाम काय आहे हे नीट कळत नसल्याने एक बेचैनी. फोन , whatsaapp, worksheet अशा वेगवेगळ्या मार्गाने मुलांपर्यंत पोहचण्याचे आमचे मार्ग चालू असतात. फोन वर नेहमी योगायोगाने सगळे भेटतीलचं असं नाही. आपण whatsapp वर पाठ्वालेले व्हिडीओ बघितले असतील का? worksheet मधले प्रश्न कळले असतील का ? गोष्टींची पुस्तके वाचतात का ? ह्या प्रश्नांनी सारखं मनात चिंता असते. कारण शिक्षकांसाठी सर्वात उत्कृष्ठ गिफ्ट म्हणजे मुलांच्या चेह-यावरची प्रतिक्रिया. 

आणि आता ती प्रतिक्रिया दिसत नसल्यामुळे एक मोठी दरी आपल्या कामात निर्माण झाली आहे. मग अचानक एक घटना घडते आणि मनातल्या सर्व प्रश्नांचे उत्तर सापडते. रत्नाचा आणि राकेशचा उत्साह (नाव बदलेलं आहे )  आणि रोहन (SAJAG Volunteer) याची ही पोस्ट - अशीच एक प्रेरणादायक घटना आहे . 

..................................................................................................................................................................

सकाळीच सजिताचा मेसेज आला


"तिला पोस्टाने वह्या पाठवल्या रे रोहन,परवाच मिळाल्या तिला वह्या....!"

मनात खूप भावना एकत्र आल्या .काही दिवसांनपूर्वी "सजग"च्या पेजवर एक पोस्ट शेयर केली होती. सजगची एक विद्यार्थिनी कोरोनोच्या अगोदर गावाला गेलेली आणि नेमकी तिकडचे अडकली पण तिने तिच्या नियमित अभ्यास क्रमात खंड पडू दिला नाही काही दिवसांनपूर्वी तिने पिंपळ पानांवर अभ्यास लिहिला आणि त्याचे फोटो सेंड केले त्यात 

रत्ना ने लिहिलं होतं ''पान कुठलही असो अभ्यास झाला ना मॅडम'' आणि म्हणाली "वही संपली आहे" 

परिस्थिती कशीही असो जिद्द माणसाला त्या परिस्तिथीवर मात करायला शिकवते हे लहानपणा पासून ऐकतंच होतो पण ह्या चिमुकलीने ते सिद्ध करून दाखवलं 

महागडे लॅपटॉप,सतत नेट कनेक्शन सर्व सुख सोई असताना सुद्धा नेहमीच परिस्थिती माझ्याच बाबतीत कशी निष्ठुर आहे ह्याच रडगाणं आपण करतं असतो ( मी ही त्यातलाच एक)

पण इच्छा असेल तर माणूस भला मोठा डोंगर सुद्धा फोडतो हेही तितकंच खरं 

रत्नाच्या जिद्दीला आणि सजगच्या कामाला मनापासून सलाम

साजिता,अनुजा,किरण ,भूषण ह्याचा सोबत राहून सजगमध्ये काम करायची संधी मिळते ह्या पेक्षा दुसरं समाधान कोणतंच नाही

आत्ता तिची वही कधीच संपणार नाही

"पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती करणारा बुद्ध आणि पिंपळपानांवर लिहून ज्ञानप्राप्ती करणारी रत्ना आज दोघेही एकचं वाटत आहे .तिची निरागसता अबाधित राहो...



No comments:

Post a Comment