Saturday, October 26, 2019

PUZZLE चे वेड


एक दिवस मी माझ्या पाच वर्षांच्या मुलाला, सर्वेशला सजग च्य अभ्यासवर्गमध्ये घेऊन गेले होते कारण त्याची शाळा लवकर सुटली होती आणि मला कोणी babysitter मिळत नव्हता. मी त्या अभ्यासवर्ग मध्ये शिकवते. सर्वेश असताना शिकवणं कठीण होतो कारण तो एकच जागी बसणार ह्याची खात्री नसते. पण शेवटचा खेळाचा तास चालू होता आणि मुलं वेगवेगळे बैठे खेळ खेळत होती. त्यात काही मुलं पझलस खेळत होते. PUZZLE म्हणजे वेगवेगळे चित्र एकत्र जोडून एक पूर्ण चित्र तयार करायचे असते. त्या पझलसमध्ये वेगवेगळे तुकडे शोधून जोडायची मजा असते आणि एक चॅलेंज पण असतो. सर्वेश पण एक पझल खेळत बसला. पहिल्यांदा असं खेळ तो बघितला होता. अभ्यासवर्ग सुटला,  मुलं घरी निघाले. पण सर्वेश अजूनही पझल मध्ये गुंतून बसला होता.  ते संपल्या शिवाय सर्वेशला घरी पण यायचं नव्हतं. मग शेवटी मी त्याला बोलले, “चल आपल्या घरी मी तुला पण असा खेळ घेईन”. मग तो निघाला.
त्या नंतर एक दिवस गेला. दोन दिवस गेले. मी काही तो विषय काढला नाही. मला वाटले तो विसरून जाईल. पण असं काही झालं नाही. त्याच्या हट्टामुळे आम्ही ते पझल घरी  आणले.  एवढे पैसे खर्च झाल्याचे वाईट वाटत होतं आणि वरून ह्याची खात्री पण  होतीच की हे पण बाकीच्या खेळण्यांप्रमाणे जास्त काळ टिकणार नाही . ज्या दिवशी पझलची घरी  delivery आली तेव्हापासून तो रोज खेळत बसला. हळू  हळू आम्ही सगळेच त्यात गुंतत गेलो. एक दिवस सर्वेश आणि त्याचे पप्पा Oggy and Cockroach चे story puzzle लावताना तास भर त्यात गुंतले होते आणि ते सुद्धा न भांडता.
त्या खेळामुळे माझ्या मुलात खूप बदल झाला. तो दिवसभरात २ तास TV बघायचा. आता तो फक्त १ तास TV बघतो. त्याच्या PUZZLE खेळामुळे त्याच्या इंग्लिश स्पेलिंग मध्ये IMPROVEMENT झाली. आम्ही दुकानात किंवा MALL मध्ये गेलो तरी तो गाड्या किंवा BALL सारखे  काही खेळ न घेता तो अजून वेगळ्या प्रकारे कुठले PUZZLE आहे का ते शोधतो. आता पझल सारखे खेळ खेळायला घेतले की तो किमान १ ते २ तास खेळतो. मला आधी वाटले खेळ नवीन असल्याने तो आठवडाभर खेळेल व नंतर खेळणार नाही. पण तो खेळ आमच्या घरी आणून १ महिना पेक्षा जास्त झाला तरी  तेवढ्याच उत्साहाने खेळतो.  आणि फक्त तो नाही घरात आम्ही सर्वच.

आशा आव्हाड
Consultant, SAJAG

                         

2 comments:

  1. खुपच सुंदर..आपणच अशाप्रकारे खेळ मुलांना देऊन किंवा त्यांच्याबरोबर खेळून त्यांच मोबाईल/टीव्ही च वेड कमी करु शकतो..तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

    ReplyDelete