शाळेच्या भिंती पलीकडेही मुलांचे एक वेगळे अस्तित्व असते हे आज Savills India कंपनीला भेट दिल्याने मला जाणवले. सजग अभ्यासवर्गातील फक्त मुलींसाठी त्यांनी ही दिवाळी निमित्त भेट आयोजित केली होती. आम्ही तिघी शिक्षिका फक्त मुलींनाच कंपनीमध्ये नेणार म्हणून सर्व मुली खूश होत्या. त्यातही कारमधून कंपनीमध्ये जाणार म्हणून अजूनच खुश होत्या. कंपनी कशी असेल? कंपनीत काय बरं असेल? अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या
चेहऱ्यावरचा उत्साह मला जाणवत होता. आम्ही
बांद्रामधील Savills India कंपनीजवळ पोहोचलो. मुलींचे लक्ष
कंपनीच्या बिल्डिंगकडे गेले. त्यातील एक मुलगी म्हणाली,' बया.... किती मोठी बिल्डिंग आहे!' ' माझ्या नवऱ्याची बायको' या सिरीयलमध्ये राधिकाची कंपनी अशीच आहे.' तिचे हे निरागस बोलणे मला आवडले. सर्व मुलीं
कंपनीच्या बाहेरील लोक, त्यांचा
पोशाख हे सर्व त्या पाहू लागल्या. मुली पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कंपनीत आल्या होत्या म्हणून त्या थोड्या घाबरलेल्याही दिसत होत्या. आम्ही कंपनीत
प्रवेश केला. सात- आठ लिफ्ट पाहून सर्वांनाच नवल वाटले.

शालेय जीवन व घराबाहेरील जीवन किती वेगळे आहे, हे मुलींच्या
चेहऱ्यावरून व त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. घरातील बंधनांमुळे खूप मुलींना बाहेरचे जग कसे आहे हे पाहायला मिळत नाही. एकदा का मुलगी मोठी झाली कि तिच्यावर
अनेक बंधनं थोपवली जातात. उदाहरणार्थ शाळेतुन
घरी आल्यावर बाहेर कुठेही जायचं नाही , लहान भावाला किंवा बहिणीला
संभाळणे, तसेच घरातील स्वयंपाक व धुणी भांडी करणे आणि समजा ती शाळेत अभ्यासात कमी पडली तर मग शाळेत
जाण्याची संधी हिरावून काढणे.
पण आजच्या या सहलीमुळे मुलांना आणि मलाही एक
नवीन जग व एक अनोखी भेट अनुभवायला मिळाली.
संचिता.अ.जोशी
Consultant, SAJAG
'
No comments:
Post a Comment