Friday, October 18, 2019

शोधाची किंमत


ह्या शोधाचा त्यांना खूप पैशे मिळाला असेल ना ?” १२ वर्षाच्या सनीने वर्गात विचारले. जेव्हा मी त्यांना पृथ्वी गोल आहे हा निष्कर्ष कसा काढला ह्या बद्दल सांगत होते. सनीच्या ह्या प्रश्नाने मला हसू आलं कारण त्या काळात असे शोध ज्यांनी केले त्यांना बक्षीस सोडून शिक्षाच मिळाली. मी वर्गात सांगायचा प्रयत्न केला कि सगळे शोध पैसांचा विचार करुन नव्हते करत. असे सांगितल्यावर आता त्यांच्या मनात हसू उमटले. आपल्या मनातले प्रश्न सोडवणे किंवा त्यांचे निरीक्षण करून उत्तर मिळवणे ह्यातच आनंद असतो आणि ह्यालाच अभ्यास म्हणतात हे कसं सांगू कळत नव्हते. हे ज्या लोकांनी केलं त्यांच्यामुळे आपल्याला एवढी सगळी माहिती उपलब्ध होऊ शकली.
पण सनीच्या मनातला प्रश्न चुकीचा होता का? कारण शाळेत अभ्यास म्हणजे आता फक्त दिलेली माहिती समजून घेणे किंवा न समजून पाठ करणे एवढंच राहिलाय. सर्वात जास्त earning potential कुठल्या field मध्ये आहे हे बघूनच तर आपण शिक्षणाचा निर्णय घेतो. ते काही न बघता त्यात invest करणार्‍यांकडे आपण मूर्खपणानेच बघतो. काहीतरी returns/फायदा मिळाल्याशिवाय आपण efforts/ मेहनत करायची गरज अजिबात नाही. म्हणून सनि सारखे अनेक गरीब कुटुंब शिक्षणात वेळ व पैसे गुंतवत नाहीत. त्याचे कारण त्या शिक्षणाचा त्यांना काही फायदा होईल असे वाटत नाही.
अभ्यास हा मार्कांसाठी आणि चांगले मार्क मिळवून  पुढे उत्तम नोकरी मिळेल ह्यासाठी करावा ह्या वातावरणात वाढणा-या कोणालाही सनीचा प्रश्न मनात येईलच ही शंकाचं. आम्ही पण त्याच वातावरणात वाढलोय. आमच्या संपूर्ण शालेय जीवनात आम्ही मार्काच्या भानगडीत इतके गुंतलो कि मार्कं मिळवणेह्यालाच अभ्यास मानत गेलो. एकप्रकारे त्याने मार्कांची स्पर्धा निर्माण झाली व त्यात जे टिकले त्याचं  ‘standard of living’ मध्ये बदल दिसते असं एक व्यहम निर्माण होतो. आणि ह्या मध्ये सनी सारख्या एका contract labour च्या मुलाला दिसत असेल कि ह्या स्पर्धेत आपल्याला काही संधी नाही.
जर शिक्षण एका कुटुंबाला आपल्यात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काही बदल होण्याची उमेद देऊ शकत नसेल तर हे सगळं अर्थहीनच वाटेल ना?

(सनी सजग अभ्यास वर्गातला एक विद्यार्थी आहे. आमच्या वर्गात नियमित पणे विविध विषयांवर चर्चा होत असल्याने  मुलांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत राहतात. त्याचं उत्तर शोधण्याची शिस्त आणि चिकाटी अजून सगळ्या मुलांमध्ये आलेली नाही. पण चर्चेचा हेतू फक्त चर्चा असल्यामुळे नवनवीन प्रश्न व नवनवीन विषय उलगडत राहतात.)      

Sajitha
Co-founder of SAJAG
Students learning the concept of Earth's rotation, Day/Night

No comments:

Post a Comment