Thursday, May 6, 2021

Bridging the Digital Gap - In Association with Chimple Learning App (Marathi )

 ‘सजग’ चे Home-Based Initiative चा अंतर्गत, Learning Centre च्या विद्यार्थ्याना Chimple Learning APP लिंक वापरायला दिली गेली. SUTARA Learning Foundation नी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वयोगटासाठी हा app बनवला आहे. ह्या app मुळे विद्यार्थ्यांचे पायाभूत कौशल्य इंग्रजी, गणित विकसित होते.  

App मार्फत शिक्षणाचा प्रयोग पहिल्यांदाच सजग नी केला आहे. आतापर्यंत सजग चे Home-Based initiative मध्ये शैक्षणिक videos, अभ्यास पुस्तिका, पालकांना मार्गदर्शन साठी विडियो कॉल हे उपक्रम राबवले गेले होते. ह्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासामधली गोडी टिकवता आली पण त्यांचे ‘learning loss’ कमी नाही करता आली. ज्यांचे पालक त्यांच्या पाल्यासोबत जास्त वेळ देऊ शकले त्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त फरक दिसला. App च्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल व स्वत:हून अभ्यास करायला सुरुवात करतील. ह्यामुळे त्यांचे वाचन, लेखन व गणित कौशल्यामध्ये नक्की भर पडेल. ह्या उद्दिष्टाने विद्यार्थ्याना App ची ओळख करून दिली.                                                                                                         अभ्यासवर्गातील 25 विद्यार्थ्यांपैकी, 22 विद्यार्थ्यांकडे android फोन आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्याना App डाउनलोड करणं शक्य झालं. पण पुढची पायरी थोडी कठीण होणार होती कारण पालकांच्या मोबाइल वापरण्यात अनेक अडचणी आल्या, विद्यार्थ्याना वेळोवेळी मोबाइल उपलब्धत होईल ह्याची खात्री नव्हती. Learning Centre मधली 44% विद्यार्थ्यांकडे मोबाइल दिवसभरासाठी उपलब्ध आहे कारण आई व वडील दोघांकडे फोन आहेत. पण उरलेले 56% विद्यार्थ्यांकडे मात्र फक्त वडीलांकडे फोन असल्यामुळे विद्यार्थ्याना फक्त रात्री फोन उपलब्ध होतो किंवा जेव्हा वडील घरी असतात तेव्हा. ह्या माहितीच्या आधारे सजग टीम चे प्रयत्न विद्यार्थ्यांना app ची ओळख करून देणे व ते सुरळीत वापरता येणे ह्यासाठी सुरू झाले.

Chimple App install करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे : -

1)   Playstore मधून app डाउनलोड करणे.  

2)   विद्यार्थ्यांचे प्रोफाइल बनवणे.  

3)   Teacher app Student App लिंक करणे OTP च्या माध्यमातून. (ह्या प्रक्रियेने विद्यार्थ्यांची App मधली प्रगती शिक्षकांना कळू शकतो)  

ह्या तिन्ही प्रक्रिया 22 पालकांचे फोन मध्ये पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक आठवडा लागला. ह्या प्रक्रियेत मदतीसाठी 2 पार्ट-टाईम शिक्षक सहभागी होते. ह्यातली  पाहिली प्रक्रिया पालकांसाठी सोपे होते. 40% पालकांनी स्वत:हून लिंक वरुन APP डाउनलोड केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी त्यांचे profile तयार केले व वापरायला सुरुवात केली. पण तिसरा टप्पा, म्हणजे APP वर OTP टाकणे,  पालकांसाठी जरा कठीण होता. 50% पालकांना फोन वरुन प्रत्येक प्रक्रियाचे मार्गदर्शन द्यावे लागले. 32% पालकांना घरी जाऊन त्यांना प्रत्यक्ष सजग शिक्षकांनी मदत केली. 18% पालक अजून connect करू शकले नाही कारण ते टाळेबंदीच्या भीतीमुळे गावी गेले. ह्या सगळ्या प्रक्रियेला 7 दिवस लागले. एवढे दिवस लागण्याचे अजून काही अडचणी होती – त्या म्हणजे, फोनचा वरचे बॅलेन्स संपणे, वडीलांचे खूप उशीरा येणं किंवा बरेच दिवस बाहेर असणे, घरी भावंडं असेल तर त्यांच्या मधील फोन वापरण्याचा वेळा असे बरेच वेगवेगळे विषय असतात.

82% पालक App डाउनलोड केले आहे. आता पुढचा टप्पा आहे त्याचा योग्य वापर. विद्यार्थ्याना assignment देणे, त्यांनी केलेल्या उपक्रमांना प्रतिसाद देणे. ह्या वापराच्या वेळेस अनेक विद्यार्थ्याना वेगवेगळ्या अडचण आल्या. विद्यार्थ्यानी एक पेक्षा जास्त प्रोफाइल बनवल्यामुळे त्यांना ट्रॅक करणे अवघड गेले. तसेच एक प्रोफाइल दोन भावंडे वापरत असल्यामुळे त्यांची प्रगती तपासणे कठीण होते. बहुतेक फोनचे RAM कमी असल्यामुळे नवीन app डाउनलोड केल्याने फोनच्या सेटिंग वर खूप मोठा परिणाम होतो. Chimple App ला जास्त जागा लागत नाही आणि डाउनलोड झाल्यानंतर वापरण्यास इंटरनेट लागत नाही. पण विडियो, गेम्स डाउनलोड केल्याचे फोनच्या सेटिंग वर कशाप्रकारे परिणाम होतो त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. हळू हळू फोन वापरताना काय काय काळजी घ्यावी लागेल ह्या बद्दलची माहिती सजगच्या पुढील नियोजनामध्ये आणायची गरज आहे.

सध्या विद्यार्थी उत्साहाने app वापरत आहे. फोन वापरण्याची मजा व अभ्यास अशा दोन्ही गोष्टी साध्य होत आहे. पालक पण समाधानी आहे कारण त्यांना मुलं फोन वर अभ्यास करताना दिसतात. आमच्या निरीक्षणात दिसून येतं कि विद्यार्थी अक्षर , अंक यांचा सराव करत आहेत. APP विद्यार्थी कशा प्रकारे वापरतात व त्याचा त्यांना अभ्यासात कशी मदत झाली हे काही दिवसांत कळेल. App च जास्तीत जास्त उपयोग कशा प्रकारे करता येईल हे पण आपल्याला समजेल. प्राथमिक वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी कोणतं डिजिटल माध्यम चांगला आहे ह्याची पण समज येईल. तर पुढच्या ब्लॉग मध्ये APP वापरायचा परिणाम अधिक स्पष्ट होईल.

Sajitha*

Co-founder

SAJAG

Chimple App Link:-  Chimple Learning App

*(घरची भाषा मराठी नसल्याने चुका असू शकतात. त्यासाठी क्षमस्व)

No comments:

Post a Comment