जेव्हा मी एखादे पुस्तक वाचायला घेते, तेव्हा त्यातली मजा, कथा याबाबत विचार चालू असतात. माझे
सर्वात आवडते पुस्तक म्हणजे मृत्युंजय हे पुस्तक वाचून खूप दिवस झाले तरी आजही
त्यातील पात्रांचे विशेषतः कर्णाचे केलेले वर्णन युद्धाचे वर्णन आजही डोळ्यासमोर
उभे राहते.संपूर्ण महाभारत आत्ताच घडून गेल्या असे वाटते.
मुलां
ना वाचन शिकवताना, मी मुलांच्या उच्चाराकडे जास्त लक्ष द्यायची मुलं वाचताना पूर्णविराम, अल्पविराम स्वल्पविराम येथे थांबतात ना याकडे लक्ष असायचे पण या पुढे असे होणार नाही.
आज मी प्रकट वाचन कार्यशाळा यातून मला मिळालेले अनुभव आपणासमोर मांडत आहे.
सजगतर्फे आम्हां सर्वांसाठी सजिता मॅमनी तृप्ती अभ्यंकर आणि प्रमोद कांबळे
बळे यांचे प्रकट वाचन कार्यशाळेचे सेशन आयोजित केले. ही कार्यशाळा म्हणजे आमच्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे. ह्या कार्यशाळेतून प्रकटवाचनाचे वेगवेगळे पैलू उलगडत गेले.
प्रकट वाचनाची तृप्ती मॅमची पद्धत अगदीच वेगळी होती मला पहिल्यांदाच समजले की वाचन ही प्रक्रिया एकदा वाचून चालत नाही तर पुस्तकाचे वाचन तीन चार वेळा केल्यास पात्र ,स्थळ , वेळ, भावना पात्रांचे बाह्यरुप ,पात्रांचे स्वभाव हे अधिक चांगल्या प्रकारे समजते.
पात्रांविषयीची चर्चा आमच्यासाठी खूपच
उपयुक्त ठरली. आम्ही व. पू .काळे यांचा बी . एम.पी 42 42 या कथेतील बी एम
पी या पात्रा विषयी चर्चा केली तेव्हा प्रत्येकाची त्या पात्र बद्दलची मते खूप
वेगवेगळी होती यावरून आम्हाला पात्रांच्या स्वभावातील वैविधता समजली त्यांच्यातील गुणदोषांवर सविस्तर चर्चा करता आली.
माध्यमिक वर्गातील मुलांना शिकवताना वाचन तीन चार वेळा करणे कसे गरजेचे आहे हे त्यांना यातून समजावता येईल व
त्यांच्याकडून पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे वाचून घेता येईल.वाचन करताना पात्र ,स्थळ पात्रांचे बाह्यरूप, त्यांचे गुणदोष या सगळ्यांचा विचार करावा
लागतो हे त्यांच्या मनावर बिंबवता येईल यासाठी या
कार्यशाळेचा मला चांगलाच उपयोग करून घेता येईल.
प्रकट वाचनाच्या एका सेशनमध्ये मॅमनी "त्या रात्री" या पुस्तकाचे प्रकट वाचन केले त्यावेळेस ते वाचन ऐकताना अंगावर
काटा आला व मनात वेगवेगळे विचार येऊन गेले त्यावेळेस झालेल्या चर्चेत फाळणीचा विषय निघाला फाळणीच्या वेळेचा प्रसंग असावा असे वाटले त्यावेळची
सामाजिक परिस्थिती याचा ऊहापोह केला गेला.त्यावेळेस झालेल्या बायका मुलांची
म्हातार्यांची झालेली परवड याविषयी चर्चा झाली .
माध्यमिक वर्गातील मुलांसोबत सामाजिक विषयावर
जरूर चर्चा करावी यातून मुलांची समाजाविषयीची मते आपल्याला समजू शकतात, आपणही समाजासाठी काहीतरी चांगले काम करू शकतो हे त्यांच्या
विचारांतून आपल्याला समजते.
चित्रावरून गोष्ट लिहिताना मॅडमनी आम्हाला काही मुद्दे सांगितले जसे सेटिंग ,वेळ ,स्थळ ,सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती मुड्स, या मुद्द्यांचा
विचार करून गोष्ट लिहिल्यास ती अधिक परिणामकारक होते व ती गोष्ट वाचताना वाचकासमोर
गोष्ट रुपी चित्रच उभं राहतं.
मला पडक्या घराचं चित्र व त्यावर जमा झालेल्या कोळ्याच्या जाळ्यांच चित्र दिलं होतं मी मॅडमनी सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार करून एक आनंदी ओसाड घर ही गोष्ट लिहिली या गोष्टीत मी बॉम्ब हल्ल्यामुळे विस्कळीत झालेले, आनंदी घर कसे ओसाड झाले याचे वर्णन केले. गोष्ट लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. चित्रावरून गोष्ट कशी लिहावी हे मला समजले.
चित्रावरून गोष्ट लिहिण्याची activity माध्यमिक मुलांना देता येईल त्यामुळे मुलं
चित्राचे निरीक्षण करून त्यांच्या मनातील विचार योग्यरीतीने मांडू शकतील. मुलांची निरीक्षण क्षमता वाढेल.
मी गेली 18 वर्षे घरगुती
प्राथमिक वर्गाच्या शिकवण्या घेत होते त्या वेळेस मुलांसोबत केलेले प्रकट वाचन
म्हणजे एक अभ्यासक्रम पूर्ण करणे या उद्देशानेच व्हायचे पण या कार्यशाळेमुळे उशीरा
का होईना प्रकट वाचनाचे मूळ उद्दिष्ट समजले आता कोणतेही पुस्तक हातात आले तरी ते
तीन चार वेळा वाचून पुस्तकातील स्थळ काळ पात्र पात्रांचे बाह्यरुप स्वभाव ह्या सगळ्यांचाच विचार सखोलपणे केला जाईल हे निश्चित.
Ruchira Puranik
SAJAG Volunteer