Tuesday, November 19, 2019

Stand and Deliver - Indeed!



मी आताच Stand and Deliver नावाचा एक सिनेमा पाहिला. तसं खूप जुनी सिनेमा आहे – १९८८ मधला. त्यात एक शिक्षक जेमी एस्कलांदे ह्यांच्या माध्यमिक शाळेत (Garefield University) एन्ट्री झाल्यानंतरची कथा. ही एक सत्य कथा आहे. जेमीची शिक्षक म्हणून प्रवास वेगळी आहे याचे कारण ही शाळा लेटिनो मुलांनी भरलेली आहे. लेटिनो मुलं अमेरिकेतील स्थलांतरीत लोकं. त्यांची मातृभाषा इंग्रजी नसल्यामुळे शाळेतला त्यांचा performance सजगच्या अभ्यासवर्गातल्या  मुलांसारखं खूप मागे असतो. फक्त इंग्रजी नाही तर त्यामुळे बाकी सगळ्या विषयातही ते मागे असतात.  
जेमी सरांच्या शिकवण्यामुळे मुलांना गणित विषय शिकण्याचा आत्मविश्वास मिळतो. तसेच मुलं पुढे calculus सारख्या अवघड गणिताच्या परीक्षा सुद्धा कशाप्रकारे पास होतात ह्याची inspiring journey अगदी सुंदररीत्या रेखाटली  हे.  
ह्या सिनेमा मधल्या दोन गोष्टी खूप भावल्या – जेमीच्या या संघर्ष मध्ये त्याच्यासोबत फक्त त्याचे विद्यार्थी होते. म्हणजे जेव्हा calculus परिक्षेत मुलांना बसवण्याची मागणी जेमी सर करतात तेव्हा शाळेतल्या बाकीच्या शिक्षकांकडून विरोध होतो कारण त्यांना ह्या मुलांकडून ही परीक्षा पास होण्याची अपेक्षा नसते. त्यामुळे शाळेला त्यांच्यावर पैसे गुंतवणं मूर्खपणाचे वाटत असते. Maybe असं पण असू शकतं कि त्यांना जमलंय असं दाखवलं तर बाकीच्यांवर बोटं उचलली जातील. पण luckily मुख्याध्यापक  जेमीसरांच्या बाजूने असतात. त्यामुळे मुलांना calculus परीक्षा देण्याची संधी मिळते आणि मुलं ती अवघड परीक्षा उत्तीर्ण  होतात. ती मुले एखाद्या विशिष्ट समाजातून असल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवणं आणि त्यांना त्यापासून परावृत्त करणे हे शिक्षण क्षेत्राचा सर्वात मोठा गुन्हा आहे असं वाटतं. जे इथे भारतातही प्रत्येक टप्प्यात सामाजिक आणि आर्थिक द्रुष्ट्या मागासलेल्या वर्गातल्या मुलांना अनुभवायला मिळतं.
आणि सिनेमातली दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जेमी सरांची शिकवण्याची पद्धत. जेमी सर गणितातली किचकट संकल्पना – उदा: रुण व धन संख्या तसेच, पूर्णांक अपूर्णांक यांची प्रॅक्टिकल  उदाहरण देऊन समजवतात. (ह्यावर सिनेमाचा एवढा फोकस नव्हता नाहीतर मग पूर्ण सिनेमा वेगवेगळ्या पाठांचा झाला असता). मग मुलांना क्लास interesting वाटायला लागतो. ते अभ्यास करायला लागतात. त्यामुळे ज्यांनी उच्च शिक्षणाचे स्वप्न देखील बघितलं नव्हतं ती मुलं पुढे युनिव्हर्सिटी मध्ये admission घेतात.  
सिनेमामध्ये त्या मुलांची अवस्था आणि सजगच्या अभ्यासवर्गातील मुलांची अवस्था यात खूप साम्य आहे. ह्या मुलांच्या वस्तीतही खूप कमी मुलांचे शिक्षण बारावी किंवा  पदवीधर पर्यंतचे  हे. ज्यांचं शिक्षण ब-यापैकी झाले आहेत ते पण तिथल्या बाकीच्यांसारखं KDMC च्या contract कामात गुंतलेत. तर काहीं्या राहणीमानात थोडासाही फरक जाणवत नाही. म्हणून कदाचित ह्या समाजात शिक्षणाचा अभाव खूप जाणवतो. शिक्षणाचे महत्त्व पटविण्यास शाळा कमी पडली. तसेच मुलांच्या अभ्यासात किंवा सामाजिक कौशल्यात प्रगती आढळत नाही. त्यामुळे त्यांना शाळेत जाण्यात अर्थ वाटत नाही.
सजगने गेली तीन वर्ष अभ्यासवर्ग चालू केला आहे. सुरुवातीला मुलांना रोज बोलवायला जावं लागायचं. इतकं निराशजनक असायचं  ते कि असं वाटायचं माझ्यासाठी अभ्यासवर्ग सुरु केलंय. नंतर अभ्यासवर्गात मुलांना सहभागी करून बरेच उपक्रम राबवले. उपक्रमांनी मुलांच्या हजेरीत प्रगती दिसून आली. नाटक, चित्रकला असे वेगवेगळ्या उपक्रमांमुळे मुलांना वर्गात येण्यास एक चांगले कारण ठरले. पण सिनेमा मध्ये दाखवलंय तसं सिनेमाच्या सुरुवातीला मुलं कंटाळा करताता आणि मग एकदम अभ्यासाकडे वळतात असं काही अनुभव मला आला नाही.  दर वेळेला प्रतिसाद तितकाच उत्साही असेल असं नाही. नाटक स्पर्धेच्या एक-दोन दिवस आधी सुद्धा मुलं दांडी मारु शकतात आणि याची कारणं बरीच आहेत – वस्तीत भांडण झालं, घालायला कपडे नव्हते, आजारी आहे, स्टेजवर जायला घाबरतो, बाकीची मुलं चिडवतात ..... अशी बरीच. त्या उलट परफोर्मन्सच्या दिवशी अती उत्साह- असे दोन्ही टोकाचे अनुभव गेल्या तीन वर्षात येऊन गेले. आणि हेचक्र अजून चालूच आहे. ज्याच्यामुळे शिक्षकांनी नेहमी सतर्क असायला पाहिजे हे तर कळलं.
मला आठवतंय आमची पहिली बॅच जेव्हा सुरु झाली तेव्हा फक्त सात मुलं होती. पण त्यातल्या दोन मुलांनी शाळा सोडली. त्याची कारणं अनेक. अजूनही मला त्याची खंत आहे कि मी का त्यांना क्लास मध्ये टिकवू शकले ऩाही. पण आता तीन वर्षानंतर मला जाणवतंय कि सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. पण मधल्या काळात जेव्हा खूप home-visits  नंतरही त्या मुलांनी येणं कमी केलं तेव्हा माझ्या मनात एक कडूपणा आला. त्यामुळे काही काळ का होईना पण क्लास मध्ये एक वेगळं वातावारण निर्माण झालं. म्हणजे कि ‘मी एवढं सगळं करते आहे तरी काही किंमत का नाहिये’. पण मला हे एवढं सगळं त्यांच्यासाठी करायला त्या मुलांनी नक्कीच नाही सांगितलं. माझी ही भावना त्या मुलांना सुद्धा जाणवली असावी कुठेतरी. अशा वेळी त्या कर्जेच्या ओझ्यातून सुटकारा मिळवणं हा एक मार्ग मुलांसमोर असू शकतो. क्लास सोडण्याची कारणं बरीच असतील.. पण माझी ही वृत्ती चुकीची आहे हे कळायला जास्त वेळ लागला नाही. माझं MSWचे शिक्षण इथे कामी आलं आणि संवाद.(एक  network मीटिंग मधल्या अनुभवी शिक्षण तज्ज्ञांच्या सोबतचा संवाद).

एवढं मात्र नक्की आहे कि मुलांसोबत संवाद साधून बदल आणू शकतात ते म्हणजे - पालक आणि शिक्षक. पण ह्या गटाताल्या पालकांना पण माहितीचा अभाव असल्यामुळे शिक्षकांना पुढाकार घेणं गरजेचे आहे.

संवाद साधताना शिक्षक काळजी घ्यायाला पाहिजे कि शिक्षक स्वत:ला देव नको मानायला, कारण ज्यांच्यात बदल घडवायचा आहे ते काही मातीचा गोळा नाही. त्या मुलांना स्वत:चे अनुभव, विचार, विश्वास आहे. आपल्याला हवा तसा प्रतिसाद नेहमी मिळणार नाही. बाकीची उरलेली  ५ मुले सजगच्या अभ्यास वर्गात नसते तर शाळा सोडले असते का माहित नाही. पण ती मुलं आता नववी पूर्ण करणार आहे. शाळेत त्यातल्या पाचही मुलांची नियमितता पण वाढली आहे. अशी प्रार्थना करू कि ते चांगल्या मार्कांनी दहावी पूर्ण करतील आणि पुढे हिचं मुलं बाकीच्या मुलांसाठी एक आदर्श बनतील.  

ज्या प्रकारे जेमी सरांनी मुलांवर एक प्रभाव आणला त्याचप्रकारे सजग काही प्रभाव आणू शकतो का हा प्रश्न मनात सारखा गुंतत असते?

सजिता कुट्टी
Co-founder SAJAG

Saturday, November 9, 2019

एक अनोखी भेट



शाळेच्या भिंती पलीकडेही मुलांचे एक वेगळे अस्तित्व असते हे आज Savills India कंपनीला भेट दिल्याने मला जाणवले. सजग अभ्यासवर्गातील फक्त मुलींसाठी त्यांनी ही दिवाळी निमित्त भेट आयोजित केली होती. आम्ही तिघी शिक्षिका फक्त मुलींनाच कंपनीमध्ये नेणार म्हणून सर्व मुली खूश होत्या. त्यातही कारमधून कंपनीमध्ये जाणार म्हणून अजूनच खुश होत्या. कंपनी कशी असेल? कंपनीत काय बरं असेल? अशा अनेक प्रश्नांनी  त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मला जाणवत होता. आम्ही बांद्रामधील Savills India कंपनीजवळ पोहोचलो. मुलींचे लक्ष कंपनीच्या बिल्डिंगकडे गेले. त्यातील एक मुलगी म्हणाली,' बया.... किती मोठी बिल्डिंग आहे!' ' माझ्या नवऱ्याची बायको' या सिरीयलमध्ये राधिकाची कंपनी अशीच आहे.' तिचे हे निरागस बोलणे मला आवडले. सर्व मुलीं कंपनीच्या बाहेरील लोक,  त्यांचा पोशाख हे सर्व त्या पाहू लागल्या. मुली पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कंपनीत आल्या होत्या म्हणून त्या थोड्या घाबरलेल्याही दिसत होत्या. आम्ही कंपनीत प्रवेश केला. सात- आठ लिफ्ट पाहून सर्वांनाच नवल वाटले.
    Savills India group मधली सर्व मंडळी वेगवेगळ्या पोशाखात होती. कोळी लोकांसारखा पोशाख  घातलेले एक सर होते. त्यांनी त्यांच्या मजेशीर स्वभावातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या सरांच्या बोलण्यातून मुलींच्या मनातील सर्व  भीती नाहीशी झाली. Group मधील निष्ठा मॅडम   मुलींची रांगोळी स्पर्धा घेतली. मुलींनी खूपच सुंदर रांगोळ्या काढल्यामुळे सर्वांना बक्षीसं मिळाली. बक्षीसं हातात मिळताच मुलींच्या चेहऱ्यावरचा वेगळाच  आनंद मला दिसला. त्यानंतर जेवणं  झाली. जेवणानंतर सर्व  मुलींनी गाण्यावर मस्त नृत्य सादर केले. एखाद्या स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे त्या नाचत होत्या. ते पाहतांना मुलींच्या चेहेऱ्यावरचे निरागस भाव बघून खूपच समाधान वाटलं. savills groupला Thanks चे ग्रिटिंगकार्ड देऊन मुलींनी हसत निरोप दिला.
      शालेय जीवन व घराबाहेरील जीवन किती वेगळे आहे, हे मुलींच्या चेहऱ्यावरून व त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. घरातील बंधनांमुळे खूप मुलींना बाहेरचे जग कसे आहे हे पाहायला मिळत नाही. एकदा का मुलगी मोठी झाली कि तिच्यावर अनेक बंधनं थोपवली जातात. उदाहरणार्थ शाळेतुन घरी आल्यावर बाहेर कुठेही जायचं नाही , लहान भावाला किंवा बहिणीला संभाळणे, तसेच घरातील स्वयंपाक व धुणी भांडी करणे   आणि समजा ती शाळेत अभ्यासात कमी पडली तर मग शाळेत जाण्याची संधी हिरावून काढणे.
 पण आजच्या या सहलीमुळे मुलांना आणि मलाही  एक नवीन जग व एक अनोखी भेट अनुभवायला मिळाली.
                                              संचिता..जोशी
Consultant, SAJAG
'