तुमच्या लायब्ररीला आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी शुक्रवारी रोजी भेट दिली.तेव्हा आम्हाला सर्वांना असे वाटले होते की काय, "लायब्ररीत जाऊन काय पुस्तक चाळायची आणि निघायचे" , असे मनाशी ठरवून आम्ही सजग येथे पोहोचलो.आम्ही आल्यावर तुम्ही आमचे प्रसन्न मनाने व चेहऱ्याने स्वागत केले ,त्यानंतर तुम्ही लायब्ररी बघण्यासाठी जी धमाल टेकनिक वापरली ती तर अप्रतिम होती.म्हणजे कोडं घालून त्याच्या उत्तरांमध्ये पुढील पुस्तक शोधायचे ,आणि अंतिम पुस्तकात ते पुस्तक वाचून त्यातून उत्तर शोधायचे.ह्या सर्व प्रकारात आम्ही खूप धमाल केली,आणि त्यानिमित्ताने अनेक पुस्तकं नजरेखालून गेली. त्यानंतर त्या सर्व पुस्तकांवर तसेच प्रत्येकाची वाचनाची आवड कशी निर्माण झाली याबद्दल तुम्ही विचारले त्यातून एक खूप छान चर्चा आपली विद्यार्थी-शिक्षक , आजची शिक्षण प्रणाली या आणि अश्या अनेक गप्पा आपल्या झाल्या. वेळ कसा निघून गेला समजले नाही.
म्हणजे आम्ही असे formalities मूड😜 मध्ये आलो होतो.आणि जाताना खूप छान पुस्तकांचा सहवास घेऊन निघालो.आणि तुम्ही आमचे खूप छान आदरातिथ्य केले अल्पोहार पण👌🏻होता.
आणि EnRead लायब्ररीत लहान मुले छान रमतील असे तुम्ही वातावरण ठेवले आहे,ते पाहून खूप छान वाटले की आज आपण बघतो मुलांना रममाण होण्यासाठी फक्त मोबाईल हवा असतो. पण अश्या लायब्ररी असतील तर त्यांना तिथे खेळता येईल व त्यातून त्यांची वाचनाची आवड निर्माण होईल.
अश्या तुमच्या सजगला भेट देऊन मला खूप छान वाटले .
सौ. दिपाली पाटील
शिक्षिका
बालक मंदीर विद्यालय